Nashik Earthquake: नाशिकला सकाळपासून दुसरा भूकंपाचा धक्का; 2.5 रिश्टल स्केलने हादरला परिसर
Earthquake. (Photo Credits: PTI)

नाशिक (Nashik)  जिल्ह्यांला आज ( 8 सप्टेंबर) सकाळपासून दोनदा भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास पहिला 3.8 रिश्टल स्केलच्या धक्क्यानंतर आता 10 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास दुसरा धक्का बसला आहे. दरम्यान हा धक्का देखील नाशिकच्या पश्चिमेकडील भागात 103 किमी दूर आहे. तसेच धक्क्याची तीव्रता ही 2.5 रिश्टल स्केलची आहे. अशी माहिती National Centre for Seismology ने दिली आहे. Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला सौम्य भूकंपाचा धक्का; NCS ची माहिती.  

दरम्यान आज पालघरमध्ये देखील काल आणि आज सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामध्ये जीवीतहानी सुदैवाने झालेली नसली तरीही घराला तडे गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.

नाशिक भूकंप दुसरा धक्का

दरम्यान मुंबई शहर देखील मागील काही दिवसांपासून भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. सलग काही दिवस पहाटे मेघगर्जना आणि वीजांचा कडकडाट आणि त्यानंतर एकीकडे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने अनेकजण धास्तावले आहेत.