Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला सौम्य भूकंपाचा धक्का; NCS ची माहिती
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नाशिक (Nashik) शहर आज (8 सप्टेंबर) सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरल्याची माहिती National Centre for Seismology विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुमारे 3.8 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. हा भूकंप नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला 103 किमीला बसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज सलग दुसर्‍या दिवशी पालघर, तलासरी, डहाणू भागालाही भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान काल देखील पालघर मध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. यामध्ये जीवितहानी झालेली नसली तरीही भूकंपामुळे पालघर मध्ये घराच्या भिंतीला तडे गेल्याची माहिती आहे. आज पालघर मध्ये देखील झालेला भूकंप 3.8 रिश्टल स्केलचा आहे.  मागील महिन्यात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे सहा सौम्य धक्के बसले होते. या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते. तसेच केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमीटर होती.

नाशिक भूकंप

मुंबईमध्येही मागील 1-2 दिवसांत भूकंप झाल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान अचानक मुंबई परिसरात मध्यरात्री मेघगर्जना, वीजांचा कडकडाट झाल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. Mumbai Rains Funny Memes: जोरदार मेघगर्जना, वीजांच्या गडगडाटाने मुंबईकरांनी पहाट झाल्यानंतर सोशल मीडियात मजेशीर मीम्स व्हायरल

काल (7 सप्टेंबर )सकाळी मुंबईच्या उत्तर दिशेला (North of Mumbai) 3.5 रिश्टेर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. मुंबई च्या उत्तर दिशेला सुमारे 102 किमी दूर 3.5 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. दरम्यान शनिवारी (5 सप्टेंबर) देखील मुंबईच्या उत्तर दिशेस 98 किमी अंतरावार 2.7 रिश्टेर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले होते.