Mumbai Rains (Photo Credits: @pratikmodi2/ @ritikrasal08/ Twitter)

मुंबईकरांची आज (7 सप्टेंबर) ची सकाळ जोरदार मेघगर्जना आणि वीज कडकडाटामध्ये झाली आहे. दरम्यान मागील काही दिवसांत दुसर्‍यांदा अशाप्रकारे पहाटेच्या सुमारास जोरदार गडगडाट झाल्याचं पहायलं मिळालं आहे. यानंतर तुरळक पावसाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई भिजल्याचं चित्र आहे. मात्र साखरझोपेत असलेले अनेक मुंबईकर दचकून उठल्याने ट्वीटरवर ‘Thor, is That You?’ असा सवाल विचारत मजेशीर ट्वीट्स पहायला मिळाली आहेत. दरम्यान मुंबईकरांनी #MumbaiRains ट्रेंड सोबत वीजांच्या कडकडाटाचा फोटो शेअर केला आहे. मग पहा त्यामधील काही मजेशीर जोक्स, गंमतीशीर मिम्स!

मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 4 ते 7 वेळेत वीजांच्या कडकडाटांसह पाऊस बरसला. ठाणे, नवी मुंबईमध्ये 100 मीमी पेक्षा अधिक पाऊस बरसला तर मुंबईच्या पूर्व भागातील शहरात 40 मीमी पेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र त्यानंतर आभाळ निरभ्र झाले आहे.

मजेदार मिम्स

महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाने थोडा ब्रेक घेतला आहे. मात्र मागील काही दिवस जोरदार मेघगर्जना झाल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी भूकंप झाल्याचेही समोर आले आहे. आजही पालघरमध्ये 3.5 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे.