Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

देशभरात कोरोनाचे खूपच भयंकर चित्र पाहायला मिळत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. दरम्यान ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची कमरता भासत आहे. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैली सुरुच आहे."करोनाचं संकट मोठं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा. त्यातून मार्ग काढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकटे करोनाशी लढू शकत नाहीत," असे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे.

केंद्राकडून राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.हेदेखील वाचा- Nitin Gadkari on Corona Pandemic: ​कोरोना महामारी स्थिती हाताळण्याच्या नेतृत्वाबाबत नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया, सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली होती भूमिक

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा टोला हाणला. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी आता बोलत आहेत. आधी विरोधक जे बोलत होते, तेच आता स्वामी बोलत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा देखील तुडवडा आहे, मोदींच काहीच नियोजन नाही. आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवून निर्णय घेण्याची गरज आहे, मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाही, असं मलिक म्हणाले.

भारतामध्ये मे महिन्याची सुरूवात कोरोनारूग्णांच्या संख्येत विस्फोटक वाढीने झाली आहे. आज भारतामध्ये पुन्हा कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ पहायला मिळली आहे. आतापर्यंतची जगातील सर्वाधिक वाढ आज नोंदवण्यात आली आहे. भारतामध्ये मागील 24 तासांत 4,14,188 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 3,915 आहे. सध्या देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2,14,91,598 पर्यंत पोहचला आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,34,083 आहे. देशात सध्या 36,45,164 जणांवर कोरोनावर उपचार सुरू आहेत.