महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर (Sharad Kesalkar) याची मंगळवारी न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली, यामध्ये त्याने 'मी आणि साथीदार सचिन अंदुरे (Sachin Andure) याने दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला,' अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (CBI) दिली.यावरून आता दाभोळकर हत्या प्रकरणाचा उलगडा वेगाने होणार असल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
सीबीआय'चे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या संदर्भात एक अहवाल विशेष न्यायालयात सादर केला. डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. 'गेल्या वर्षी जून महिन्यात मी अॅड. पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी अॅड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता,' असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत 'सीबीआय'ला सांगितले. फेब्रुवारी 2019 मध्ये 'सीबीआय'कडून न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले होते. Narendra Dabholkar murder case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील 3 आरोपींना न्यायालयाकडून जामीन
20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात सकाळच्या वेळेस दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे ही दोन नावे समोर आली. या दोघांनी मिळून हत्येसंर्भातील पुरावे, हत्यारे नष्ट करण्यास मदत केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती.