Narendra Dabholkar murder case: डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येतील 3 आरोपींना न्यायालयाकडून जामीन
डॉ.नरेंद्र दाभोळकर (फोटो सौजन्य- ट्विटर)

Pune: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 3 आरोपींना पुणे सत्र न्ययालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच सीबीआयने 90 दिवस उलटल्यानंतरही या आरोपींवर आरोपपत्र दाखल न केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोपी अमोल काळे, राजेश बांगेरा आणि अमित देवगेकर अशी त्यांची नावे आहेत. यामधील अमोल हा एटीएस(ATS) च्या ताब्यात आहे. तर राजेश आणि अमित या दोघांना गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटकातील एसआयटीच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या 20 ऑगस्ट, 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून करण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला मनीष नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. या दोघांचा हत्येप्रकरणी सहभाग असल्याचे काही निष्पन्न झाले म्हणून त्यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते.