
कोरोना काळात सुरु असलेल्या कारखान्यांसंबंधी संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्या खात्याशी संबंधित होता. या प्रश्नाला आपण कागद न घेता आकडेवारीसह उत्तर दिले, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणे यांचा संसदेतील एका भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल (Narayan Rane on Viral Video) झाला आहे. या व्हिडिओबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी हे स्पष्टीकरण दिले. केंद्र सरकारचा कारभार आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सुरु असल्याचेही राणे यांनी म्हटले.
डिएमके खासदार कनिमोझी करुणानिधि यांनी संसद अधिवेशनादरम्यान प्रश्न विचारला होता. हा प्रश्न नारायण राणे यांच्या सुक्ष्म आणि लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाशी संबंधित होता. कनिमोझी यांनी इंग्रजित प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतान राणे यांना राणे यांना कनिमोझी यांनी विचारलेला प्रश्न निटसा समजलेला नाही हे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या लक्षात आले. यावेळी लोकसभा अध्यक्ष बिरला यांनी राणे यांना प्रश्न दोन वेळा समजावून सांगत मदत केली. (हेही वाचा, Narayan Rane’s Security: मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय गृह खात्याकडून ‘Z’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था)
दरम्यान, राणे यांनी संसदेत प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातही सोशल मीडियावर जोरदार वाद पाहायला मिळत आहे. राणे यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलही करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत राणे यांना प्रश्न विचारला असता, आपण कागद न घेता आकडेवारीसह उत्तर दिल्याचे राणे यांनी सांगितले.