नांदेड येथे वळूने दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Facebook)

नांदेड (Nanded) येथील भरस्त्यात लाल रंगाची साडी घातलेल्या महिलेलाच वळूने (Ox) पाठून येऊन जोरात धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वळूने महिलेला जोरदार धडक दिल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. महिला रस्त्यात उभी असताना वळूने तिला धडक दिली. परंतु महिलेकेच्या हातात बाळ सुद्धा होते. वळूने महिला बेसावध असताना धडक दिल्याने ती जवळजवळ 5 ते 10 फूट दूरवर फेकली गेली.(मुंबई लोकल रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करणाऱ्यांनो सावधान! भोगावी लागेल पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा)

मात्र महिलेच्या शेजारी अन्य सुद्धा काही महिला आणि मुलगी उभी होती. त्यांना वळूने धडक न देता फक्त लाल रंगाच्या साडीमधील महिलेलाच धडक दिली. या प्रकारावर संताप व्यक्त केला जात असून मोकाट फिरणाऱ्या जनावरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.