Pune: चांदणी चौक उड्डाणपूल (Chandni Chowk Flyover) मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून त्याला मुळशी सत्याग्रहात योगदान दिलेल्या सेनापती बापट (Senapati Bapat) यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highway Authority) आणि पुणे महापालिका आयुक्तांना (Pune Municipal Commissioner) पत्र लिहून केली आहे.
मुळशी तालुक्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 मध्ये 'मुळशी सत्याग्रह' आंदोलन केले, जे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला आवाज देणारे पहिले मोठे आंदोलन होते. नुकतीच मुळशी सत्याग्रहाला 100 वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून चांदणी चौक उड्डाणपूलाला सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकारचं पुढे काय होणार? कोर्टाचा आजचा निकाल ऐकून तुम्हालाही 'हे' प्रश्न पडले आहेत का? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं)
या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चांदणी चौकातील उड्डाण पूल प्रकल्पाला ‘सेनापती बापट उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, ज्याद्वारे स्वातंत्र्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून प्रत्येकाने त्यांच्या लढ्याचे स्मरण करावे, असे खासदार सुळे यांनी पत्रात लिहिले आहे. (हेही वाचा - Bhagat Singh Koshyari On SC Verdict: सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी करणे माझे काम नव्हे- भगत सिंह कोश्यारी (Watch Video))
पुणे शहराला मुळशी तालुका आणि परिसराशी जोडण्यात हा पूल मोठी भूमिका बजावणार आहे. तसेच पुणे-सातारा-बेंगळुरू महामार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. हा रस्ता वर्दळीचा व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघात याबाबत खासदार सुळे सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होत्या. चांदणी चौकातील पुलाचे काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे आभार मानले आहेत.