अंगावर पेट्रोलचे थेंब उडल्याने नागपूर (Nagpur) येथील एका पेट्रोल पंपावर महिला कर्मचाऱ्यांनी (Petrol Pump Lady Workers) तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना नागपूर येथील मेडिकल चौक परिसरात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Viral Video on Social Media) झाला आहे. पेट्रोल भरताना पेट्रोलचे थेंब अंगावर उडले. त्यातून तरुणी आणि महिला कर्मचारी यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यावसण पुढे हाणामारीत झाले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नागपूर येथील मेडिकल चौक परिसरात असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल कंपनीच्या तीन महिला कर्मचारी एका तरुणीला मारहाण करत असल्याचे दिसते. मारहाण करणाऱ्या महिलांनी लाल रंगांचा गणवेश परिधान केला आहे. त्यावरुन या महिला पेट्रोल पंपावरील कर्मचारी असाव्यात असा तर्क लावला जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. (हेही वाचा, Desi Jugaad Bullet Video: विनापेट्रोल चालणारी बुलेट, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यालाही फायदा; पाहा व्हिडिओ)
प्राप्त माहितुसार एक, एक तरुणी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेली. तिने आपल्याला हवे तेवढे पेट्रोल आपल्या वाहनात भरले. दरम्यान, पंपावर पेट्रोल भरणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्याकडून पेट्रोलचे काही थेंब तरुणीच्या कपड्यांवर उडले. यावरुन ग्राहक असलेल्या तरुणीने कर्मचाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तिने पुरुष कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. ते पाहून पंपावरील महिला कर्मचारी पुरुष कर्मचाऱ्यांच्या मदतीला आल्या. त्यांनी तरुणीला पकडून मारहाण केली.