NMC Programmer for beggers (Photo Credits: ANI)

भारतात कोरोना व्हायरसचे लोण दिवसेंदिवस पसरत चालले असून 21 दिवसांचा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्याचा परिणाम रोजंदारीवर जगणा-या लोकांवर झाला आहे. काम नसल्यामुळे पोटाची खळगी भरायची कशी असा मोठा प्रश्न अशा गोरगरिबांसमोर निर्माण झाला आहे. अशा स्थितीत नागपूर महानगरपालिकेने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे (NMC Commissioner Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वाखाली अनिभव उपक्रम सुरु केला आहे. लॉकडाऊनच्या अशा गोरगरीबांना त्यांच्या कौशल्यानुसार काम देण्याचे प्रशिक्षण सुरु केले आहे. त्याचप्रमाणे बेघर असलेल्या गरीबांना निवासी घरे देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात लोकांचे हाल होऊ नये म्हणून अन्नधान्य, औषधे, भाज्यांचा पुरवठा त्यांना व्यवस्थित रित्या करण्याचे काम महाराष्ट्रात सुरु आहे. तसेच गोरगरीबांना या सुविधा कमी दरात तसेच मोफत वाटपाचे काम देखील सुरु आहे. मात्र अशा परिस्थितीत अशा बेरोजगार झालेल्या गोरगरीबांना त्यांच्या योग्यतेनुसार काम देऊन त्याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम नागपूर महापालिकेने हाती घेतला आहे. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 232 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 2916 वर

ANI चे ट्विट:

त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरही त्यांना काम मिळू शकते या धर्तीवर हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात 232 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, राज्यात एकूण रुग्ण संख्या 2916 झाली आहे. आज 36 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आतापर्यंत 295 रूग्ण बरे झाले आहेत व त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 187 मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी आज 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर, देशात गेल्या 24 तासांमध्ये 1,118 नवीन प्रकरणे समोर आली आहेत व अशाप्रकारे भारतातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11,933 वर पोहचली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये, बीएमसीने (BMC) दिलेल्या माहितीनुसार आज शहरात 183 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह केसेस आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईतील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1936 आणि मृत्यू 113 झाले आहेत.