नागपूर: चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराकडून मॉडेलची हत्या, आरोपीला अटक
Representational Image | (Photo Credits: ANI)

नागपूर (Nagpur) येथे एका प्रियकराने प्रेयसीवर चारित्र्यावरुन संशय घेत तिची निघृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोठावल्या असून मृत तरुणी 19 वर्षाची असल्याचे सांगितले जात आहे. तर मृत तरुणीला मॉडेल बनण्याची इच्छा होती.

खुशी परिहार असे मृत तरुणीचे नाव आहे. खुशी हिचे अशरफ शेख (28) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मिळालेल्या माहितीनुसार, खुशी स्थानिक फॅशन शो मध्ये भाग घेत असे. परंतु शनिवारी सकाळी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह पंडुरना-नागपूर महामार्गावर सापडला असून चेहरा विद्रूप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हत्या करण्यात आलेल्या महिलेचा शोध लावला. त्यावेळी खुशी नावाची तरुणी असून तिला मॉडेल बनण्याची इच्छा असल्याचे पोलिसांना कळले.(हेही वाचा-मुंबई पोलिसांनी केला बाळ चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक)

अटक केलेल्या आरोपी अशरफने आपला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला आहे. तर चारित्र्यावरुन संशय असल्याने खुशीची हत्या करण्यात असल्याने त्याने तिची निघृण हत्या केली असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.