Arrest | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Nagpur News : नागपूरमध्ये अल्पवयीन मुलांना तसेच तरूण पिढीला नशेच्या आहारी पाठवणाऱ्या हुक्का (Hookah) पार्लवर पोलिसांनी (Nagpur Police) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी संचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत (Crime News) त्यांना अटक केली आहे. धरमपेठेतील क्युबा हुक्का पार्लर येथे अल्पवयीन मुलांना (minor children) तसेच तरूणांना छुप्या पद्धतीने हुक्का पुरवला जात होता. नागपूर क्राईम ब्रँचला याची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून कारावई केली. रविवारी ही कारवाई पार पडली. या कारवाईत पोलिसांनी संचालक प्रफुल्ल चौधरी (38), सहकारी प्रणय महाजन (24 रा. तेलंगखेडी), सूरज निखाडे (21), तौहीद शेख (22) आणि अझहर खान (21) यांना अटक केली आहे. (हेही वाचा:Pune Crime News: वर्गात क्षुल्लक कारणांवरून भांडण झाल्याने 10 वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कात्रज येथील चौघांवर गुन्हा दाखल )

नागपूरमध्ये धरमपेठे हा उच्चभ्रू परिसर मानला जातो. त्या परिसरात गोतमारे, कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर प्रफुल्ल चौधरी गेल्या दोन वर्षांपासून हे पार्लर चालवत होते. यापूर्वीही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा चौधरींने तोच व्यावसाय सुरू ठेवला होता. या वेळी पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या कारवाईत पार्लरमध्ये छुप्या पद्धतीने काही अल्पवयीन युवकांना प्रवेश दिला जातो हे पोलिसांना समजले होते. त्यावर पोलिसांनी सापळा रचून, गोतमारे संकुलातील कार्यालये बंद झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून कुलूप लावूव केवळ विश्वासातील लोकांनाच प्रवेश दिला होता. (हेही वाचा:Mumbai Crime News: वडाळ्यात 12 वर्षीय मुलाचे अपहरण, 35 दिवसांनी छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह)

या ठिकाणी पोलिसांना दोन अल्पवयीन मुले आणि इतर ग्राहक हुक्का ओढताना आढळले. विशेष म्हणजे, पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चौधरी याने हुक्का पार्लर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पोलिसांनी संचालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सध्या सुरू आहे.