Representational image (Photo Credit- IANS)

Mumbai Crime News: काही दिवसांपूर्वी वडाळ्यातून 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. आता त्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली (crime news) आहे. संदीप यादव असे मृत मुलाचे नाव आहे. 28 जानेवारी रोजी संदीपचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शव शांतीनगर खाडीजवळ सापडले ( kidnapping and murder case ) आहे. तब्बल 35 दिवसांनंतर संदीपचे मुंडके सापडले आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी शेजारीच राहणाऱ्या एका बंगाली तरुणावर पोलिसांकडून संशय व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा : Mumbai Crime News: बंद बॅगेत सापडला तरुणीचा मृतदेह, गळा आवळून खून केल्याचा संशय, कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल )

मिळालेल्या माहितीनुसार, वडाळ्यातील शांतीनगर परिसरात संदीप यादव हा त्याच्या पालकांसोबत राहत होता. 28 जानेवारी रोजी शेजारी राहणाऱ्या बिपीनने कोल्ड्रिंक प्यायच्या बहाण्याने त्याला नेले. तेव्हापासून संदीप घरीच परतला नव्हता. तेव्हापासून विपूल हा देखील गायब होता. त्यामुळे संशयाची पहिली सुई त्याच्यावरच जात होती. 28 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास संदीप घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नव्हता. तेव्हा त्याच्या पालकांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, तो मिळाला नाही. शेवटी घाबरून तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली गेली. तेव्हा सीसीटिव्ही फुटेज तपासले असता तो शेजारी राहणाऱ्या बिपीनसोबत गेल्याचे दिसले. (हेही वाचा :Mumbai Crime News: वडाळ्यात सापडला अर्ध जळलेला महिलेचा मृतदेह, गुन्हा दाखल )

त्यानंतर, रात्री 12च्या सुमारास बिपीन घरी आल्यानंतर त्याला शेजाऱ्यांनी पकडून चोप दिला. तसंच, संदीप कुठे आहे? अशी विचारणा केली. तेव्हा त्याने मुलाला तृतीयपंथीयाला विकले अशी बतावणी केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला पोलिसांत दिले. मात्र त्याने बाथरुमला जाण्याच्या बहाण्याने तिथून पळ काढला. बिपीन पसार झाल्यानंतर तब्बल 35 दिवसांनंतर म्हणजेच सोमवारी कुजलेल्या अवस्थेतील संदीप धड आणि मंगळवारी शिर वडाळ्यातील खाडीजवळ सापडले. मृतदेहाच्या अंगावरील टी शर्ट आणि हातातील कडं यावरुन संदीपची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

बिपीनचा इतिहास

बिपीनवर स्वतःच्याच पत्नीची हत्या केल्याचा संशय आहे. तो पॅरोलवर सुटून आला होता. पॅरोलवरुन बाहेर आल्यानंतर तो संदीपच्या घराशेजारील खोलीत राहू लागला. मुलांच्या तस्करीत उतरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.