Ruta Awhad Reaction To Controversial Statement: राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांची जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) शी तुलना केली होती. दरम्यान, शुक्रवारी ऋता आव्हाड यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ऋता आव्हाड यांनी सांगितले की, गुरुवारी ठाण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान केलेले विधान संपादित केले गेले आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.
ऋता आव्हाड यांनी सांगितले की, आजची पिढी वाचत नाही. म्हणून मी त्यांना मोबाईल दूर ठेवून वाचायला सांगितले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या 'विंग्ज ऑफ फायर'चा मी विशेष उल्लेख केला, कारण त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. यावेळी मी हेही निदर्शनास आणून दिले की, ओसामा बिन लादेन हा दहशतवादी का झाला? कोणीही चांगला किंवा वाईट जन्माला येत नाही. ओसामाबद्दल एक पुस्तक आहे जे त्याच्या मृत्यूनंतर अनेक महिने न्यूयॉर्कमध्ये बेस्टसेलर राहिले. एखादा व्यक्ती चांगल्या किंवा वाईटाच्या मार्गावर कसा जातो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. परंतु, माझे विधान संपादित केले गेले, असंही ऋता यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -Ruta Samant On Jitendra Awhad: विनयभंगाच्या गुन्ह्यावर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची प्रतिक्रिया)
'माझे विधान संपादित करण्यात आले'; ऋता आव्हाड यांची प्रतिक्रिया -
Thane: On her statement on Osama Bin Laden, Ruta Awhad, wife of NCP-SCP leader Jitendra Awhad says, "Today's generation doesn't read. So, I told them to leave their mobile phone and read instead. I had told them to read 'Wings of Fire' by Dr APJ Abdul Kalam. His journey is… pic.twitter.com/pnOlOULp3K
— ANI (@ANI) September 27, 2024
नेमकं काय म्हणाल्या होत्या ऋता आव्हाड?
ऋता आव्हाड यांच्या या वादग्रस्त विधानामुळे विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मुंब्रा येथील एका कार्यक्रमात ऋता आव्हाड म्हणाल्या की, 'तुम्ही ओसामा बिन लादेनचे चरित्र वाचावे. एपीजे अब्दुल कलाम जसे भारताचे राष्ट्रपती झाले, त्याचप्रमाणे ओसामा बिन लादेन दहशतवादी झाला. पण तो दहशतवादी का झाला? समाजानेच त्याला त्या दिशेने ढकलले,' असे ऋता आव्हाड यांनी म्हटलं. (हेही वाचा, Jitendra Awhad Booked Under Section 354: जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा, ठाणे परिसरात तणाव; नेमकं काय घडलंय? पाहा व्हिडिओ)
भाजपचे नेते शेहजाद पूनावाला यांनी ऋता आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावर टीका करताना म्हटलं आहे की, 'राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ओसामा बिन लादेनचा बचाव करतात आणि त्यांचे गौरव करतात, त्यांची तुलना एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करतात! जितेंद्र आव्हाड यांनीही एलईटी दहशतवादी इशरत जहाँचा बचाव केला होता.'