Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Ajit Pawar on Supriya Sule: सध्या राज्यभरात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अजित पवारही त्यांच्या नियोजित 'जन सन्मान यात्रे'वर निघाले आहेत. त्यादम्यान, अजित पवारांनी जनतेला भावनिक साद दिली. लोकसभा निवडणूक 2024 (LokSabha Election 2024) मध्ये बहिण 'सुप्रिया सुळे(Supriya Sule) विरोधात पत्नि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांना उभे करून चूक झाली, राजकारण घरात येऊ देऊ नये', असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली होती. ही लढत संपूर्ण राज्यामध्येच चर्चेचा विषय ठरली होती. निवडणूकीवेळी दोन्ही बाजूंनी अनेक आरोपप्रत्यारोप करण्यात आले होते. पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांच्यासह महायुतूने मोठी तागद लावली होती. मात्र, दोन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुशळे यांनी त्यांचा मतदारसंघ सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात जावू दिला नाही. मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या.

गेल्या वर्षी जुलैमध्ये, अजित पवार इतर आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले होते. त्यामुळे शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. निवडणूक आयोगाने नंतर अजित यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले.

'माझ्या सर्व बहिणींवर माझे प्रेम आहे. घरात राजकारण येऊ देऊ नये. माझ्या बहिणीविरुद्ध सुनेत्रा यांना निवडणूकाच्या मैदानात उतरवण्याची चूक मी केली आहे. असे व्हायला नको होते. पण राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने निर्णय घेतला. मला वाटते. ते चुकीचे होते,' असे अजित पवार म्हणाले. काही दिवसांवर रक्षाबंधन येऊन ठेपला आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का असे विचारले आसता. 'सध्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दिवशी जर सगळे एकाच ठिकाणी असतील तर तो त्यांना नक्कीच भेटेल', असे ते म्हणाले.

'जन सन्मान यात्रेत केवळ शेतकरी, महिला आणि तरुणांसाठीच्या विकास आणि कल्याणकारी योजनांवर बोलण्याचा निर्णय घेतला आहे', माझ्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी ही यात्रा नाही. असे अजित पवार म्हणाले.