प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Facebook)

सध्या सोशल मीडियात टिकटॉकच्या अॅपवरुन व्हिडिओ बनवणे हे आपणच खुद्द कलाकार आहोत असे दर्शवणे. या अॅपच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ युजर्सला दिवसेंदिवस पाहायला मिळतात. तसेच काही द हरवेला नवरा म्हणे टिकटॉकमुळे मिळाला असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता मुरबाड (Murbad) येथील एका तरुणाला टिकटॉकचा व्हिडिओ बनवण्यासाठी केलेला बाईक स्टंट अंगलट आला आहे.

सोशल मीडियात या तरुणाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील तरुण बाईक स्टंट करत असताना अचानक त्याची बाईक पलटली जाते. यामधील मुख्य बाब म्हणजे तरुणाने हा स्टंट करण्यापूर्वी हेल्मेटसुद्धा घातले नसल्याचे दिसून येत आहे. बाईक जशी पलटली गेली तसा तरुण डोक्यावर आपटला गेला आहे. यामुळे तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.(शिर्डी: Tik Tok चा आणखीन एक बळी, व्हिडीओ बनवताना चुकून गोळी चालवली गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू)

मात्र तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरुणाच्या मित्रांनी घडलेला प्रकार तरुणाच्या घरी कळू नये म्हणून त्याच्या सोबत काय झाले हे घरातील मंडळींसोबत लपवले. टीकटॉकच्या दुरउपयोगामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती.