मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 567 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 97 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 52 हजार 445 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 855 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 23,693 जणांना कोरोनावर मात केली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: भारतात पहिल्यांदाच कोरोना विषाणू सक्रीय रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ; देशाचा Recovery Rate 48.88 टक्के
एएनआयचे ट्विट-
1567 more #COVID19 cases & 97 deaths reported in Mumbai today. Total number of cases in the city is now at 52445, including 23693 recovered/discharged, 26897 active cases & 1855 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/de7MyDYfd3
— ANI (@ANI) June 10, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.