Sameer Wankhede: समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपणार, मुंबई NCB ला मिळणार नवा प्रमुख; वाचा सविस्तर
Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

मुंबई एनसीबी विभागाला नवा प्रमुख मिळणार आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) नेतृत्वात एनसीबी भलतीच चर्चेत आली. वानखेडे यांच्या काळात एनसीबीने केलेल्या अनेक कारवाया वादग्रस्त ठरल्या. ही लढाई पुढे न्यायालयातही पोहोचली. असे वादग्रस्त व्यक्तीमत्व समीर वानखेडे यांचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विभागाच्या प्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आहे. त्यांनी एनसीबीमध्ये कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ मागितली नाही. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी आता नवे अधिकारी येणार असल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली.

समीर वानखेडे आणि एनसीबी

समीर वानखेडे हे एनसीबीचा एक वादग्रस्त चेहरा ठरले होते.

सप्टेंबर 2020 मध्ये डेप्युटेशनवर ते एनसीबीच्या मुंबई कार्यालयात रुजू झाले

ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या काळात वानखेडे यांनी विविध प्रकरणे हाताळली.

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने केलेल्या कारवाईत 96 जणांना अटक करत 28 केसेस दाखल झाल्या.

एनसीबीने 2021 मध्ये 234 लोकांना अटक करत 117 केसेस दाखल केल्या

वादग्रस्त वानखेडे

एनसीबी अधिकारी म्हणून काम करताना समीर वानखेडे यांनी केलेल्या अनेक कारवाया वादग्रस्त ठरल्या. अभीनेता सुशांत सिंह प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव आले. यात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्याने एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. त्यानंतर एनसीबीने दीपिका पादूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंग यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. (हेही वाचा, Sameer Wankhede यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपणार; 300 हून जास्त लोकांना केली अटक, 1000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त)

ट्विट

कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर टाकलेल्या छाप्यात एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि इतर आठ जणांना अटक केली. ही अटक अत्यंत वादग्रस्त ठरली होती. ही अटक आणि एकूणच प्रकरण म्हणजे फर्जीवाडा असल्याचा महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केला होता. आर्यन खान प्रकरणात एनसीबीने वापरलेल्या साक्षीदारांवरुनही मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. या आधी ते डीआरआयमध्ये कार्यरत होते. सप्टेंबर 2020 मध्ये ते एनसीबीमध्ये डेप्युटेशनवर रुजू झाले. दरम्यान, त्यांनी केलेल्या अनेक कारवाया वादग्रस्त ठरल्या. त्यामुळे ते चर्चेत आले. दरम्यान, पदाचा कार्यकाळ वाढवून न मागितल्याने वानखेडे यांच्या जागी नवा अधिकारी येण्याची शक्यात वर्तवली जात आहे.