suicide | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

ठाणे पश्चिम येथील एका इमारतीवर चढून तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळीच अग्निशमन दलाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहाचल्याने तरूणीला वाअचवण्यात यश आलं असून मोठा अनर्थ टळला आहे. अद्याप तरूणीच्या आत्महत्येमागील नेमकं कारण समजू शकलेलं नाही मात्र या तरूणीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी टाकण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ठाणे पश्चिम येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस शाळेजवळ भास्कर अपार्टमेंट ही 13 मजल्याची इमारत आहे. या इमारतीच्या 6 व्या मजल्यावर चढून तरूणी उडी मारण्याच्या प्रयत्नामध्ये होती. या तरूणीने स्वतःच्या अंगावर काही जखमा करून घेतल्या होत्या. या घटनेची माहिती समजताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. अधिकार्‍यांनी तरूणीला उडी न मारण्यासाठी बोलवण्यात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. याच वेळेस एका पोलिस कर्मचारी सिव्हिल ड्रेस मध्ये सहाव्या मजल्यापर्यंत पोहाचला. त्यानंतर काही कर्मचार्‍यांच्या मदतीने तरूणीला वाचवण्यात पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना यश आलं. सध्या या प्रकरणाची ठाणे नगर पोलिस स्टेशनमध्ये तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी मोबाईल गेमच्या व्यसनात अडकलेल्या एका कॉलेज विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ठाण्यात आज आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरूणी 25 वर्षीय आहे. पण तिने हा प्रकार का केला याचा अधिक तपास सुरू आहे.