प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

मुंबईत राहणाऱ्या महिलेला अस्थिभंगाची शस्रक्रिया करण्यापूर्वी चुकीच्या पद्धतीने भुलीचे इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. प्रमिला देवरे असे महिलेचे नाव असून त्या रात्रीच्या वेळेस बाईकवरुन घरी जात होत्या. त्यावेळी खड्डा चुकवण्यासाठी बाईकचा तोल जात असल्याचे पाहिल्याने त्यांनी बाईकवरुन उडी मारली. त्यामुळे प्रमिला यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर प्रमिला यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रमिला यांच्यावर 19 नोव्हेंबर रोजी शस्रक्रिया करण्यात येणार होती. तत्पूर्वी त्यांना भुलीचे इंजेक्शन दोन वेळा दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप घरातील मंडळींनी डॉक्टरांवर लगावला आहे.

पहिल्या वेळेस प्रमिला यांना भुलीचे इंजेक्शन न चढल्याने त्यांना दुसऱ्या वेळेस ही तेच करण्यात आले. मात्र प्रमिला यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयातील डॉक्टरांच्या विरोधात कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तसेच प्रमिला यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे डॉक्टरांनी स्पष्ट केले नाही. परंतु आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(मुंबई: KEM रूग्णालयात आगीत होरपळलेल्या 3 महिन्यांंच्या प्रिंसचा अखेर मृत्यू)

गुरुवारी प्रमिला यांच्या नाकातोंडातून गुरुवारी रक्त येत होते. मात्र याबाबत डॉक्टरांना विचारले असता त्यांनी त्याकडे कानाडोळा केला गेला. प्रशासनाकडून आधी सही करा त्यानंतर सही देतो असा दबाब आणण्यात आल्याचा आरोप देवरे यांच्या कुटुंबियांनी केला आहे.