KEM Hospital (Photo Credits-Facebook)

केईएम रूग्णालयामध्ये आयसीयूत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत होरपळल्याने 3 वर्षीय प्रिन्सचा ( Prince Pannelal Rajbhar) हात कापावा लागला होता. मागील काही दिवसांपासून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे सुरू असलेले प्रयत्न आज (22 नोव्हेंबर) दिवशी अखेर अपयशी ठरले. आज प्रिन्सचा उपचारादरम्यान पहाटे 3 च्या सुमारास मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची अवस्था गंभीर होत होती. मुंबई: KEM मध्ये होरपळून हात गमवलेल्या 3 महिन्यांच्या प्रिन्सला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार.

 मूळचा उत्तर प्रदेशातील प्रिंस हृद्यविकारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईमधील परेलमध्ये असलेल्या पालिकेच्या केईएम रूग्णालयात दाखल होता. दरम्यान 7 नोव्हेंबरला रूग्णलयात ईसीजी मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यानंतर गादी जळून झालेल्या अपघातामध्ये प्रिन्सचा हात भाजला. त्यानंतर तो कापावा लागला. या अपघातामध्ये प्रिन्सच्या हाताला, कानाला गंभीर दुखापत झाली होती. प्रिन्स हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू होते.

ANI Tweet 

केईएम रूग्णलयात झालेल्या या अपघातानंतर अनेकांनी हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाचा निषेध केला होता. मुंबई पालिका प्रशासनाकडून त्याला मदत जाहीर करण्यात आली आहे. 2018 साली अशाप्रकारे राजेश मारू या तरूणाचा नायर रूग्णालयात एमआरआय मशीनमध्ये खेचलं गेल्याने मृत्यू झाला होता.