चर्चगेट स्टेशनवरील महात्मा गांधी यांचे 25 लाखाचे चित्र हटवणार
Churchgate station Gandhi Mural ((Photo Credits :Wikimedia Comons)

चर्चगेट स्टेशनचं (Churchgate Station)आकर्षण असलेले महात्मा गांधी यांचं छायाचित्र लवकरच उतरवलं जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चर्चगेट स्टेशनवर जोरदार वार्‍यामुळे होर्डिंग कोसळून मधुकर नार्वेकर या वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवासी सुरक्षिततेसाठी हे अ‍ॅल्युमिनिअमचे होर्डिंग्स काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चगेट स्टेशन जवळ होर्डिंग कोसळून मृत पावलेल्या मधुकर नार्वेकर यांच्या कुटुंबियांना पश्चिम रेल्वेची मदत

पश्चिम रेल्वेच्या समिती निर्णयानुसार इमारतीवरील फसाडची जोडणी कमकुवत झाल्याने जोरात वारे वाहू लागले तर भविष्यात अपघाताची शक्यता आहे. 12 जून दिवशी फसाडचे काही भाग निखळल्याने मधूकर नार्वेकर या वृद्धाचा नाहक बळी गेला होता.

मुंबईत स्थानक सुशोभिकरणाच्या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधींचे चित्र रेखाटण्यात आलं होतं. ब्राझिलियन कलाकार Eduardo Kobra ने हे चित्र साकारलं होतं. 2012 साली हे चित्र उभारण्यात आलं होतं.