प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत बऱ्याच महिला कामासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लोकलने प्रवास करत असतात. मात्र काही वेळेस रात्री उशिरा जर महिला लोकलने प्रवास करत असल्यात तिला थोडी भीती वाटतेच. तर यापूर्वी महिलांसोबत लोकलमध्ये रात्रीच्या वेळेस किंवा दिवसाढवळ्यासुद्धा गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनकाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत,

तर आता पश्चिम रेल्वे (Western Railway)  स्थानकावरुन महिलांसाठी प्रशासनाने सखी व्हॉट्सअॅप ग्रुप (Sakhi WhatsApp Group) सुरु केला आहे. त्यामुळे महिलांना लोकलच्या प्रवासादरम्यान कोणताही अडथळा आल्यास सखी व्हॉट्सअॅपसाठी देण्यात आलेल्या क्रमांकावर फोन करुन मदत मिळवू शकणार आहे. Sakhi WhatsApp Group Number: 9004449698

तर व्हॉट्सअॅपच्या या सखी ग्रुपमुळे महिला थेट आरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधू शकतात. त्यामुळे आता महिलांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण असल्यास फक्त त्यांनी दिलेल्या क्रमांकावर आपली तक्रार दाखल केल्यास तुम्हाला मदत केली जाणार आहे.