
Water Cut in Mumbai: मुंबईत येत्या 26-27 ऑक्टोंबरला पाणी पुरवठ्यावर 24 तासांसाठी परिणाम होणार आहे. कारण महापालिकेकडून भांडुप कॉम्प्लेक्स आणि पिसे पांजरापूर कॉम्प्लेक्स येथील पाणीपुरवठ्याजवळ दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, भांडुप कॉम्प्लेक्स येथे 1910 दशलक्ष उदंचन केंद्रात दोन 1200 मिलीमीटर व्यासाचा स्लुईस झडपा बदलण्यात येणार आहेत. त्याचसोबत पिसे-पांजरापूर कॉम्प्लेक्स येथील तृतीय टप्प्याच्या उदंचन केंद्रातील एक दुरुस्त न करण्यात आलेले उदंचन संच बसविण्याचे काम केले जाणार आहे.(Mumbai Railway Update: मध्य रेल्वेने गेल्या सहा महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 71.25 कोंटीचा दंड केला वसूल)
या संदर्भातील दुरुस्तीचे काम 26 ऑक्टोंबरला सकाळी 10 वाजता सुरु होईल. तर 27 ऑक्टोंबरला सकाळी 10 वाजता पूर्ण होईल असे महापालिकेने म्हटले आहे. तर 15 टक्के शहर आणि उपनगरात 26 ऑक्टोंबरला सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी कपात असणार आहे. तर पवई येथे लीकेज सुद्धा आहे. यामुळे के-ईस्ट, एस, जी-नॉर्थ आणि एच-ईस्ट वॉर्डात पाण्याचा पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.(Maharashtra Unlock: थिएटर्स आजपासून 50 टक्के क्षमतेसह सुरु करणयास परवानगी)
के-ईस्ट मधील काही परिसरात ही पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यानुसार चकाला, प्रकाश वाडी, रामक्रृष्ण मंदिर रोड, जेबी नगर, बगारका रोड, क्रांती नगर जी-नॉर्थ वॉर्ड, धारावी मुख्य रोड, गणेश मंदिर रोड आणि एच-ईस्ट वॉर्ड वांद्रे टर्मिनल येथे सुद्धा पाणी येणार नाही आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी महापालिकेने सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.