Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

Mumbai Vaccination:  मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण ठप्प झाले होते. त्यानंतर आज पासून पुन्हा एकदा लसीकरण सुरु होणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. त्यानुसार मुंबईत 1 लाख 35 हजार लसींचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मात्र हे डोस फक्त पुढील दोन दिवसच पुरतील ऐवढेच आहेत. दरदिवशी मुंबईत 50 हजार नागरिकांना लसीचे डोस दिले जात आहेत. यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या डोसचा समावेश आहे. तर महापालिकेने गुरुवारी ट्विट करत लसीकरण शुक्रवारी बंद राहणार असल्याचे म्हटले होते.

शुक्रवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा असल्याने त्याचे डोस दिले जाणार नाहीत असे सांगण्यात आले होते. त्यानंतर शनिवार सुद्धा हिच परिस्थिती निर्माण झाली होती. तर रविवारी सुट्टी असल्याने लसीकरण केंद्रे बंद होती. मात्र आज पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवर लसींचे डोस नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.(Aurangabad: कोरोनामुळे टुरिस्ट बसेस मागील 18 महिन्यांपासून बंद; Tax Incentive ची राज्य सरकारकडे मागणी)

Tweet:

दरम्यान, मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे वारंवार सांगितले जात आहे. तर  मुंबईत कोरोनाचे आणखी 555 रुग्ण आढळले असून 666 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचसोबत आतापर्यंत 702376 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. सध्या मुंबईत 7354 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची महापालिकेने माहिती दिली आहे.