
Mumbai: कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच मुंबईत अमेरिकेतून परतलेला व्यक्ती ओमिक्रॉन संक्रमित झाला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे, या 29 वर्षीय तरुणाने फायझर लसीचे तीन डोस घेतले होते. महापालिकेच्या मते या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणताही लक्षणे आढळून आलेली नाहीत. परंतु रुग्णाला खबरदारी म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.(Omicron: मुंबईत मॉल आणि रेस्टॉरंट मध्ये लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मिळणार प्रवेश)
महापालिकेच्या मते विमानतळावर 9 नोव्हेंबरला झालेल्या कोरोनाच्या चाचणीवेळी या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले गेले. दिलासादायक बातमी अशी की, त्याच्या संपर्कात आलेल्या दोन जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
महापालिने प्रेसनोट मध्ये असे लिहिले की, रुग्णाला खबरदारीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल केले आहे. मुंबईत कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा 15 वर पोहचला आहे. यामधील 13 रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला गेला आहे. महापालिकेने असे ही म्हटले की, आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षण दिसून आलेली नाहीत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा 40 वर पोहचला आहे.(KDMC Oxygen Supply Facility: मागील दोन कोरोना लाटांच्या तुलनेत तिप्पट ऑक्सिजन साठा तयार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा दावा)
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचा नवा वेरियंट ओमिक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी गुजरातमध्ये 2 आणि महाराष्ट्रात 8 लोक ओमिक्रॉन संक्रमित झाले आहेत. नव्या प्रकरणानंतर देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन वेरियंटमुळे संक्रमित रुग्णांचा आकडा 113 झाला आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या मते शुक्रवारी आणखी 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.