Mumbai University Undergraduate Admission: 12 वी परीक्षांच्या निकालानंतर मंडळाकडून HSC कडून देण्यात येणार्या गुणपत्रिका वाटपात उशिर झाल्याने रेंगाळलेली प्रवेशप्रक्रिया 17 जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आज मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेमध्ये आज (20 जून ) दिवशी दुसरी मेरीट लिस्ट जाहीर होणार आहे. कॉलेजच्या वेबसाईटवर संध्याकाळी 5 च्या सुमारास ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. Mumbai University Admissions 2019 साठी आवश्यक कागदपत्र कोणती ?
मुंबई युनिव्हर्सिटी पदवी अभ्यासक्रम 2019 दुसरी मेरीट लिस्ट
दुसरी कट ऑफ लिस्ट: June 20, 2019
कागदपत्रांची छाननी: June 20, 2019
फी भरण्याची मुदत: June 20 ते June 22, 2019
विद्यार्थ्यांना मदतीसाठी 02066834821 हा खास हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर यादी जाहीर केली जाणार आहे. मुंबईतील पाच टॉप कॉलेजची पहा पहिली कट ऑफ लिस्ट
पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 1-2% ने वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे यंदाही पहिली कट ऑफ लिस्ट 90% पार गेल्याचं चित्र आहे. बीएमएम,बीएससी, बीएससी आयटी या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.