Mumbai University Admission 2019 मध्ये बदल; 17 जूनला जाहीर होणार mu.ac.in वर पहिली मेरीट लिस्ट, येथे पहा सुधारित वेळापत्रक
Mumbai University Admission 2019 (Photo Credit: unsplash.com)

मुंबई युनिव्हर्सिटीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी जाहीर होणारी पहिली मेरिट लिस्ट आज (13 जून) दिवशी जाहीर होणार होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत नव्या वेळापत्रकानुसार 17 जून दिवशी ही यादी mu.ac.in वर जाहीर केली जाणार आहे. तसेच 14 जून ऐवजी 18 जूनपासून विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची छाननी सुरू होणार आहे. यंदा 6 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. मात्र महाराष्ट्र बोर्डाकडून HSC Marksheet देण्यास उशिर झाल्याने आता ही प्रवेशप्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ प्रवेशप्रक्रियेचं नवं वेळापत्रक

  • पहिली कट ऑफ लिस्ट: June 17, 2019
  • कागदपत्रांची छाननी: June 18, 2019
  • फी भरण्याची मुदत: June 18 ते June 20, 2019
  • दुसरी कट ऑफ लिस्ट: June 20, 2019
  • कागदपत्रांची छाननी: June 20, 2019
  • फी भरण्याची मुदत: June 20 ते June 22, 2019
  • तिसरी कट ऑफ लिस्ट: June 24, 2019
  • कागदपत्रांची छाननी: June 24
  • फी भरण्याची मुदत: June 24 ते June 26, 2019

Mumbai University Admissions 2019 साठी आवश्यक कागदपत्र

  • विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साइज फोटो
  • स्कॅन केलेली स्वाक्षरी
  • 10th चं सर्टिफिकेट/मार्कशीट यांची सेल्फ अटेस्टेड कॉपी
  • 12th मार्कशीट सेल्फ अटेस्टेड कॉपी
  • SC / ST / PwD / CW / KM / OBC सर्टिफिकेट
  • ईडब्ल्यूएस प्रमाण पत्र

विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास 02066834821 या हेल्पलाईन क्रमांकावर ते संपर्क साधू शकतात. मुंबई विद्यापीठ वेळोवेळी होणारी अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवते.