Mumbai University (Photo Credits- Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. आता सत्र परीक्षाही (Semester Exam) ऑनलाईन (Online) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल करण्याबाबत विचार सुरु आहे. कोविड-19 (Covid-19) संसर्गाचा धोका कायम असल्याने या शैक्षणिक वर्षातील सत्र परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. (SSC, HSC Exams 2021 मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड)

कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या असून त्यांचे निकालही जाहीर करण्यात आले. मात्र या परीक्षांच्या निकालात विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सत्र परीक्षा घेताना परीक्षेच्या सुरुवात बदल करण्यावर विचार सुरु आहे. दरम्यान, अंतिम वर्षांची ऑनलाईन परीक्षा घरी बसून द्यायची होती. त्याचबरोबर महाविद्यालयांकडून प्रश्नसंच पुरवण्यात आले होते. तसंच बहुपर्यायी प्रश्न पत्रिका असल्यामुळे निकालात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, असा अंदाज आहे. 25-30% नी निकाल वाढल्याचे पाहायला मिळाले.

अंतिम वर्षांच्या परीक्षेत तासाभरात केवळ 25 प्रश्न सोडवायचे होते. त्याचबरोबर बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्नपत्रिका असल्याने एक प्रश्नासाठी दोन मिनिटांचा वेळ मिळत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे काहीसे सोपे गेले. त्यामुळेच सत्र परीक्षेत प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसंच यंदा प्रॉक्टिकल्सही झाली नसल्याने त्यासाठीही पर्यायी मार्गचा शोध सुरु आहे.

सत्र परीक्षा म्हणजे  प्रत्येक सत्राला स्वतंत्र विषय आणि स्वतंत्र परीक्षा. मुंबई विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम या पद्धतीनेच सुरु आहेत.

कोरोना व्हायरस संकटामुळे विद्यांपीठांच्या परीक्षांबाबत मोठा गोंधळ उडाला होता. अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द केलेल्या राज्य सरकारला पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परीक्षा घ्याव्या लागल्या. मात्र त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये मोठी संभ्रमास्वथा निर्माण झाली होती. दरम्यान, आता परीक्षा होऊन निकालही हाती आले आहेत.

कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आल्याने दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालयं टप्पाटप्याने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.