मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) उशीरा लागणाऱ्या निकालामुळे याआधी अनेकदा उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. मात्र तरीही विद्यापीठाच्या कामात फारसा बदल झालेला जाणवत नाही. एकीकडे यंदाही पदवीच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांचे निकाल अजूनही रखडूनच आहेत. तर दुसरीकडे LLB , BEd यांसारख्या अभ्यासक्रमात प्रवेशाची मुदत संपत चालली आहे. ही अडचण लक्षात घेत गुरुवारी 1 ऑगस्ट ला मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागप्रमुखांची एक बैठक घेण्यात आली होती. यामध्ये राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा सेल तर्फे Common Entrance Test (CET) Cell निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल असा एक निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मूळ निकाल हाती येईपर्यंत ऑनलाईन मार्कशीटच्या राजपत्रित प्रती (Gazzetted Copy) वापरून विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशअर्ज भरता येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'मध्ये सावळा गोंधळ; FYBA च्या तब्बल 236 विद्यार्थ्यांना परीक्षेत भोपळा
प्राप्त माहितीनुसार, मूळ निकाल हाती येईपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून विद्यार्थी ही ऑनलाईन मार्कशीट सादर करू शकतात, मात्र निकाल मिळताच मूळ प्रत पडताळणीसाठी संबंधित कॉलेजमध्ये सबमिट करणे अनिवार्य असेल. यासोबतच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी LLB आणि BEd च्या प्रवेश अर्जाची मुदत 5 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठातर्फे संलग्न कॉलेजेसना विद्यार्थ्यांसाठी गॅझेटेड म्हणजेच अधिकाऱ्यांच्या सहीने अधिकृत केलेल्या मार्कशीट पुरवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी या मार्कशीट ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर अपलोड करून संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची सही घ्यायची आहे. खुशखबर! एकाचवेळी अनेक पदव्या प्राप्त करण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार; विचारविनिमय करण्यासाठी यूजीसीने नेमली समिती
दरम्यान, याआधीही मुंबई विद्यापीठाच्या उशिरा लागणाऱ्या निकालामुळे परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशात बाधा आली होती. यंदा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला असला तरीही ही समस्या सोडवण्यासाठी एक कायमचा उपाय शोधणे गरजेचे आहे.