दहावी परिक्षेच्या वर्गात 16 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या एका शिक्षकाला तब्बल 14 वर्षांनी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाने मुलीची मराठी विषयाच्या पेपरवेळी 2007 मध्ये छेड काढली होती. त्यानुसार विक्रोळी दंडाधिकारी कोर्टाने त्याला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचसोबत 5 हजार रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला आहे.(Odisha Murder Case: भुवनेश्वरमध्ये व्यक्तीने पत्नी आणि नऊ वर्षांच्या मुलाची केली हत्या, आरोपीला अटक)
शिक्षकाने मुद्दाम मुलीच्या हाताला आधी स्पर्श केला. त्यानंतर तिच्या बाजूला बसून त्याच्या पायावर आपला पाय ठेवू लागला. तर प्रत्यक्षदर्शीने सुद्धा कोर्टाला त्या वेळी काय घडले होते त्याबद्दल सांगितले. आरोपी चंद्रकुमार शिंदे याच्याबद्दल बोलताना कोर्टाने म्हटले की, आरोपीने तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तर पेपर लिहित असतानाच तिच्यासोबत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. कोर्टाने आरोपीला Probation of Offenders Act अंतर्गत त्याची सुटका करण्यास मनाई केली.(UP: महिन्याभरापूर्वी मुलीवर बलात्कार केल्यानंतर आता झाडाला लटकलेला मिळाला मृतदेह, नातेवाईकांनी केला हत्येचा आरोप)
मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती 16 मार्च 2017 रोजी परीक्षेसाठी आली होती. त्यावेळी सकाळी 11.30 वाजता ते 1.30 दरम्यान पेपर होता. त्याच दिवशी परिक्षेच्या हॉलमध्ये आरोपीची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली होत. परिक्षा सुरु झाल्याच्या एका तासानंतर आरोपी तिच्याजवळ येत त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. नंतर काही वेळाने आरोपी तिच्या बाकावर बाजूला बसत तिच्या पायावर पाय देऊ लागला. मुलीने त्यावेळी आरडाओरड केली आणि रडू लागली. त्याचवेळी आरोपी तेथून निघून गेला होता.