UP: महिन्याभरापूर्वी मुलीवर बलात्कार केल्यानंतर आता झाडाला लटकलेला मिळाला मृतदेह, नातेवाईकांनी केला हत्येचा आरोप
Death (Photo Credits-Facebook)

UP: उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका अल्पवयीन मुलीचा संशयित मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पीडितेचा मृतदेह एका झाडाला लटवलेला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेच्या वडिलांनी आरोप लावला की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीसोबत गावातील एका मुलाने गैरवर्तन केले होते. त्यांनी पोलीस आणि आरोपी यांच्यात संबंध असल्याचा आरोप लावला आहे.(Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये पतीकडून पत्नीला बेदम मारहाण, महिलेचा मृत्यू, आरोपी अटकेत)

आदमपुर ठाणे परिसरातील हे प्रकरण आहे. वडिलांनी असे म्हटले की, 25 सप्टेंबरला गावातीलच सुभाष याने घरात घुसून मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. या प्रकारानंतर पोलिसांना याची माहिती दिली असता एका पोलिसाने मुलीला धमकावले आणि बलात्काराऐवजी छेडछाड झाल्याची तक्रार दाखल केली. त्याचसोबत मुलीने आपली साक्ष मॅजिस्ट्रेट कोर्टात सुद्धा दिली.

पीडितेच्या वडिलांनी आरोप लावत म्हटले की, पोलीस कर्मचारी हा आरोपीच्या घरी येत-जात होता. तर 25 सप्टेंबरला घडलेल्या घटनेनंतर 31 ऑक्टोंबर पर्यंत पोलिसांनी कोणताही कारवाई केली नाही. त्यानंतर वारंवार जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली गेली.(UP Crime: मिर्झापूरमध्ये थट्टा केल्याच्या रागातून 2 रीच्या विद्यार्थ्याला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उलटे लटकवले, आरोपी मुख्यध्यापकावर गुन्हा दाखल)

मुलगी जेव्हा घरी दिसली नाही तेव्हा त्यांनी तिचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. तेव्हा तिचा मृतदेह हा एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. मुलीची हत्या सुभाष आणि तिच्या भाऊ मोनू यांनी केल्याचा आरोप वडिलांनी लावला आहे. या प्रकरणी राजकरण सुद्धा तापले आहे. यावरुन युपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख समाजवादी पार्टीने ही घटना दु:खद, लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.