उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मिर्झापूर (Mirzapur) येथून एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने (principal) शिक्षा म्हणून एका मुलाला शाळेच्या (School) इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उलटे लटकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या मुलाचा लटकलेला फोटो पाहून आणि त्यासारखे आणखी फोटो मोठ्या संख्येने फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा दंडाधिकारी प्रवीणकुमार लक्षर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मुख्याध्यापकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहरौरा येथील सद्भावना शिक्षण संस्था ज्युनिअर हायस्कूलमध्ये गुरुवारी ही घटना घडली आहे. शाळेचे मुख्याध्यापक मनोज विश्वकर्मा हे सोनू यादव या इयत्ता 2 रीतील विद्यार्थ्याने जेवताना त्यांची थट्टा केल्यामुळे संतापले होते. रागाच्या भरात त्याने मुलाला एका पायाने पकडून शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीत लटकवले आणि त्याला इतर विद्यार्थ्यांसमोर धडा शिकवला. हेही वाचा PM CARES Fund: दिल्ली उच्च न्यायालयात पीएम केयर फंड संबंधित याचिकेवर 18 नोव्हेंबरला सुनावणी
मुलाने ओरडून माफी मागितल्यानंतर विश्वकर्माने त्याला ओढले. ही घटना कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली. त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार लक्षर यांनी या प्रकरणाची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे आदेश दिले. तसेच मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सोनूचे वडील रणजीत यादव म्हणाले, माझा मुलगा इतर मुलांसोबतच गोल गप्पा खायला गेला होता आणि ते थोडे खोडकर आहेत. यासाठी मुख्याध्यापकांनी अशी शिक्षा दिली ज्यामुळे माझ्या मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो.