Cold | Photo Credits: PTI

देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आलेली शीतलहर आता राज्यातही परिणाम दाखवू लागली आहे. रविवारी उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि पंजाबसह अनेक ठिकाणी 5 सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी, मुंबईच्या (Mumbai Cold Wave) तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईत गुलाबी थंडीचे आगमन झाल्याने मुंबईकर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरसह साताऱ्याच्या तापमानात घसरण पाहायला मिळत आहे.

ठाणे, मुंबई, नवीमुंबईत उद्या (29 डिसेंबर) सकाळी तापमानात तीव्र घट होण्याची शक्यता आहे. या परिसरात किमान तापमान 15 अंशाच्या आसपास जाऊ शकते. ठाणे आणि नवीमुंबईत पारा अजून खाली उतरण्याची शक्यता आहे. यामुळे पहाटे लवकर घराबाहेर पडणारे तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरज आहे. उत्तर भारतात यंदाचा हिवाळा अधिक तीव्र असेल, असा इशारा हवामान खात्याने याआधी दिली होता. सोबतच, थंडीमुळे नागरिकांत कोरोनाची अधिकच धास्ती निर्माण झाली आहे. हे देखील वाचा- Mumbai: थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर आठ ड्रोन, 40 हजार पोलीस ठेवणार करडी नजर

हवामान विभागाचे ट्विट-

मुंबईकरांच्या प्रितिक्रिया-

ट्विट-

ट्विट- 

ट्वीट-

राज्यात थंडीचा कडाका वाढत असल्यामुळं आता लॉकडाऊनची परिस्थीती काहीशी सुधारत असल्याची पाहत गिरीस्थानांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कुठे गुलाबी तर कुठे बोचरी थंडी सध्या सर्वत्रच पाहायला मिळत आहे. तापमानाच झालेली ही घट पाहता पर्यटन स्थळे पुन्हा बहरु लागली आहेत.