Mumbai: थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर आठ ड्रोन, 40 हजार पोलीस ठेवणार करडी नजर
New Year's Party (Photo credits: Needpix)

Mumbai:  कोरोना व्हायरसची (Coronavirus) परिस्थिती पाहता राज्य सरकारने 5 जानेवारी पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तर पुढील दोन दिवसाच थर्टी फर्स्ट (Thirty First) साजरा केला जाणार आहे. मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षात थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचे सेलिब्रेशन जोरदार नसणार आहे. कारण राज्य सरकारने रेस्टॉरंट, पब आणि हॉटेल्स यांना आपले उद्योगधंदे 11 वाजताच बंद करावेत असे आदेश दिले आहेत. याच कारणास्तव आता मुंबईत थर्टी फर्स्टच्या दिवशी आठ ड्रोन आणि 40 हजार पोलीस पार्ट्या 11 वाजता बंद होतायत का हे पाहण्यासाठी तैनात केले जाणार आहेत. पोलिसांकडून शहरातील रस्ते, बीच आणि अन्य महत्वांच्या ठिकाणावर करडी नजर ठेवली जाणार आहे.

पोलिसांनी थर्टी फर्स्ट साजरी करावी असे म्हटले पण नागरिकांना गर्दी करु नये अशा सूचना ही दिल्या आहेत. त्याचसोबत 11 वाजेपर्यंतच थर्टी फर्स्ट साजरी करण्यास परवानगी दिली गेली आहे. इमारतीच्या गच्चीवर सुद्धा जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या दोन शिफ्ट लावल्या जाणार असून प्रत्येक शिफ्टमध्ये 20 हजार पोलीस कार्यरत असतील. हे पोलीस कोरोनाच्या नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवणार आहेत.(New Year Celebration in Mumbai: यंदा बोटीवर किंवा इमारतीच्या गच्चीवर नवं वर्षाच्या पार्ट्यांना परवानगी नाही, नियमाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई)

नागरिक गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, वांद्रे बँन्डस्टँड, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ येथे लहान ग्रुपने फिरु शकतात. मात्र त्यावेळी चारहून अधिक जणांना फिरण्यास परवानगी नसणार आहे. तर एखाद्या रेस्टॉरंट किंवा पब कडून नियमांचे उल्लंघन केले गेले तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई ही केली जाणार आहे.(Night Curfew: रात्रीच्या 'संचारबंदी'दरम्यान प्रवाशांना मुंबई विमानतळावरून ये-जा करण्याची परवानगी)

शहरात विविध पथके ही तैनात केली जाणार असून महिलांसोबत छेडछाडीचे प्रकार होऊ नयेत यावर त्यांचे लक्ष असणार आहे. तर सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी असे म्हटले की, नागरिकांना घराबाहेर पडून सेलिब्रेशन करण्यावर बंदी नसणार आहे. परंतु संचार बंदीच्या काळात ग्रुपने एकत्रित राहण्यास परवानगी नाही.