अखेर भाजप-शिवसेना युती झालीच, जनभावनेचा आदर राखत आगामी निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय
अखेर भाजप-शिवसेना युती झालीच, जनभावनेचा आदर राखत आगामी निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय (फोटो सौजन्य-ANI)

सर्व जनतेचे लक्ष फक्त शिवसेना (Shivsena)-भाजप (BJP) पक्षाच्या युतीकडे लागून राहिले होते. तर आज सोमवारी (18 जानेवारी) रोजी वरळीतील ब्लू सी येथे संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अखेर भाजप-सेना युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तर येणाऱ्या आगामी लोकसभा-विधासभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुक लढवणार असल्याचा महत्वपूर्ण निर्यण घेण्यात आला आहे.

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सेना-भाजप युतीबाबात अधिकृत घोषणा केली आहे. तसेच मातोश्रीवर झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून त्याबाबत लोकसभेच्या 48 जागांवर भाजप-25 जागा आणि शिवसेना 23 जागा लढवणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे. तर विधासभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवणार आहेत. तसेच पत्रकार परिषदेवेळी नाणार प्रकल्प आणि राम मंदिराच्या मुद्दयावरुन ही घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा-शिवसेना, भाजप युतीचं जमलं बरं का; उद्धव ठाकरे, अमित शाह उद्या अधिकृत घोषणा करण्याची शक्यता)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीपूर्वी भाजप पक्षकडून अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासोबत सोफिटेल हॉटलेमध्ये चर्चा झाली. त्यानंतर युतीच्या चर्चेसाठी सर्व मंडळी मातोश्रीवर पोहचली. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी ही शिवसेना पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थिती लावली होती. गेल्या पाच वर्षात शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली. त्यामुळे आता युतीचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.