Divyansh Singh & Fire Brigade Jawan (Photo Credits: ANI)

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकातील चाळीत राहणारा दिव्यांश सिंग (Divyansh Singh) हा 3 वर्षाचा मुलगा गटारात पडून वाहून गेला आहे. बुधवार, (10 जुलै) पासून दिव्यांश याचा शोध घेण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी मेहनत घेत आहेत. परंतू त्याचा शोध लागत नसल्याने अखेर काल (12 जुलै) च्या रात्री उशिरा त्याची शोधमोहीम थांबवत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पोलिस, पालिका, अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक दिव्यांशचा शोध घेत होते मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले नाही. मुलगा वाहून गेल्याच्या घटनास्थळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची धाव, लगावला मुंबईकरांवरच गटारांची झाकणे उघडी ठेवण्याचा आरोप

ANI Tweet

10 जुलै, बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दिव्यांश आंबेडकर चौकातील चाळीसमोरील उघड्या गटारात पडला. या दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. त्यामुळे दिव्यांश गटारात पडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तीन मॅनहोल उघडून गटारापासून खाडीपर्यंत जवळपास दहा किलोमीटरपर्यंत च्या भागात दिव्यांशचा शोध घेतला. यामध्ये ड्रोनचाही वापर करण्यात आला होता. मात्र त्याचा शोध लागला नाही. उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी मुंबई महापालिकेने जाहीर केला नंबर

दिव्यांश गटारात पडल्याच्या दुर्घटनेच्या नंतर दुसर्‍याच दिवशी परिसरातील त्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी पालिकेविरोधात रास्तारोको देखील केले.