मुंबई: गोरेगांव येथे तीन वर्षांचा मुलगा गटरात पडला; शोधकार्य सुरु (Video)

मुंबईतील गोरेगाव येथील आंबेडकर नगरात एक 3 वर्षांचा मुलगा नाल्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

मुंबई: गोरेगांव येथे तीन वर्षांचा मुलगा गटरात पडला; शोधकार्य सुरु (Video)
3-year-old boy fell in a gutter in Goregaon (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथील आंबेडकर नगरात (Ambedkar Nagar) एक 3 वर्षांचा मुलगा नाल्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मुलाला शोधण्यासाठी पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून सध्या युद्ध पातळीवर शोधमोहिम सुरु आहे. (पुणे: 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला तब्बल 16 तासांनंतर बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश)

दिव्यांश असे या मुलाचे नाव असून काल (10 जुलै) रात्री पावणेदहाच्या सुमारास तो घराबाहेर खेळत असताना उघड्या नाल्यात पडला. मुसळधार पावसामुळे नाल्यात पाण्याचा प्रवाह वेगात होता. दिव्यांश कोठे दिसत नाही म्हणून शोध घेतला असता तो नाल्यात पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले. त्यानंतर दिव्यांशला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु झाली. मात्र अद्याप तो सापडलेला नाही.

ANI ट्विट:

दिंडोशी पोलिसांसह अग्निशामक दलाचे जवानही दिव्यांशला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईत घडणाऱ्या दुर्घटना पाहता बाहेर पडताना किंवा लहान मुलांना घराबाहेर सोडताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 11, 2019 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).