Hindmata Premises Mumbai | (PC - Twitter)

मुंबईचा पाऊस (Mumbai Rain) आणि साचणारे पाणी हे मुंबईकरांसाठी नवे नाही. नेहमीच येतो पावसाळा. या उक्तीप्रमाणे मुंबईच नेहमीच साचते पाणी, अशी मानसीकताच मुंबईकरांनी बनवलेली असते. पण, यंदाचा पावासाळा काहीसा अपवाद ठरण्याची शक्यता आहे. मुंबईत थोडावेळ जरी पाऊस झाला तरी हिंदमाता परिसरात (Hindmata Premises Mumbai) पाणी साचते. मात्र या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदावर असताना आणि मुंबई महापालिका (BMC) यांनी पाठीमागील एक वर्षभर केलेले व्यवस्थापन कामी येताना दिसत आहे. यंदा संततधार पाऊस पडूनही मुंबईतील हिंदमाता परिसरात दुपारी 12 वाजेपर्यंत पाणी साचले नाही.

हिंदमाता परिसरात संततधार पाऊस पडूनही पाणी साचले नाही. त्यामुळे मुंबईकरांना सुखध धक्का बसला आहे. दरम्यान, मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरती असून मुसळधार पाऊस झाल्यास पाणी साचण्याची शक्यता अद्यापही व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Ratnagiri Rain Update: रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी)

मुंबईतसरासरी पाऊस (07 जून, दुपारपर्यंत)

मुंबई शहर भागात 95-98 मिमी

उपनगरात 115-124 मिमी

ट्विट

पावासाळ्यात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवर्षीच पाणी साचते. त्यामुळे वाहतूक यंत्रणांवर ताण येतो. जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे यंदा आगोदर चोख व्यवस्थापण करायचे, असा चंगच पालिका प्रशासन आणि सरकारने बांधला होता. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि मुबंई महापालिका कामाला लागली होती. परिणामी वर्षभर चोख नियोजन केल्यामुळे आज दुपारी 12 वाजेपर्यंत तरी संततधार पाऊस पडला तरी मुंबईत पाणी साचले नव्हते. हिंदमाता परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये पाणी साठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा हिंदमाता परिसरात पाणी साचले नाही. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परळ, दादर भागात मोठा पाऊस सुरु होताच महापालिका कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.