Mumbai Rains Update: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीपासून दमदार पावसाची हजेरी, आजही दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता- IMD
Mumbai Rains Update: Photo Credits: ANI/Twitter)

मुंबईत (Mumbai) गेल्या अनेक दिवसात तापमानातील चढ-उतार सुरुच आहेत. कधी कधी अचानक गरमी जाणवू लागते तर कधी कधी. मात्र काल (13 डिसेंबर) रात्रीपासून मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबईत (Navi Mumbai) पावसाने दमदार हजेरी आहे. आज पहाटेपासूनही पावसाची संततधार काही भागात सुरुच आहे. थंडीत एकाएकी पाऊस पडल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याने मुंबईकरांची आजही पहाट खूपच चांगली झाली. मुंबई, ठाणे, नवीन मुंबईत मागील 6 तासांपासून ही संततधार सुरुच आहे. थोडक्यात मुंबईला हुडहुडी भरली या वातावरणाने मुंबईकरही सुखावला आहे. दरम्यान आज दिवसभर देखील मुंबईत वातावरण ढगाळ राहिल असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

मुंबईत काल रात्रीपासून कोसळणा-या पावसाने मुंबईकर सुखावले. दिवा,डोंबिवली,कल्याण आणि ग्रामीण भागात देखील पावसाची रिपरिप सुरुच आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. आजही हे ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याची शक्यता मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Weather Forecast: मुंबई, कोकण सह महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2-3 दिवस रिमझिम पावसाची शक्यता

मुंबईत कालही छान थंडी पडली होती. मात्र रात्री अचानक सुरु झाल्याने लोकांची धांदल उडाली. सध्या अनेक भागात पावसाने मुंबईच्या काही भागात विश्रांती घेतली आहे. तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी अधूनमधून कोसळत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात थंडीच्या दिवसात पाऊस पडत असल्याची ही पहिलीच वेळ आहे. संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस पडत आहे. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण, पुढचे 48 तास जवळपास असंच वातावरण असणार आहे.