Maharashtra Weather Forecast: मुंबई, कोकण सह महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2-3 दिवस रिमझिम पावसाची शक्यता
Maharashtra Rains Update | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची सर बरसत असल्याने अनेकांना महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल अनेक प्रश्न पडले आहेत. दरम्यान हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात थोडे बदल झाले आहेत. पुढील काही दिवस हे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे राहणार आहेत. पुढील 2-3 दिवस पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने वातावरण देखील अशाच प्रकारे ढगाळ राहणार आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे या भागात पुढील 2-3 दिवस पावसाच्या सरी बरसणार आहेत. मुंबईत काल रात्री आणि आज पहाटे देखील हलका पाऊस शिंपडला आहे. मुंबईत रस्ते ओले आहेत. तर सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. आज दिवसभर अशाच प्रकारे हलका पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे.

के एस होसाळीकर ट्वीट

उत्तर भारतामध्येही मुंबई प्रमाणेच दिल्लीत दाट धुक्यात मागील काही दिवस पाऊस बरसल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. आज सकाळी धुक्यामुळे दिल्ली शहरात रस्त्यावर व्हिजिबिलिटी कमी आहे. तर कश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. मुंबई मध्ये काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागली होती. त्यामुळे वातावरणात बदल निर्माण होत थोडा गारवा जाणवत होता. मात्र आता पुन्हा पावसाचं वातावरण निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण असूनही थंडी जाणवत नाही.