Mumbai Rains: मुंबईकरांसाठी Open Manhole ठरतायत जीवघेणे; पाहा व्हिडिओ
Manhole | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) शहरात मुसळधार पावसाने (Mumbai Rains) दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. रस्ता, फुटपाथ आणि रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतो आहे. दरम्यान, मुंबईत रस्त्यांवर पाणी साचले असताना उघडे असलेले ड्रेनेजचे होल (Open Manhole) नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. या आधीही Open Manhole मध्ये पडून अनेक मुंबईकर आणि सर्वसामान्यांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या वर्षीही मॅनहोल अशाच प्रकारे धोकादायक ठरत आहे. सोशल मीडियावर Open Manhole मध्ये पडून मरता मरता थोडक्यात वाचलेल्या नागरिकांचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

मुंबई शहरातील Open Manhole हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. 'नेहमीच येतो पावसाळा' अशी एक कविता आहे. त्याचप्रमाणे मुंबईत नेहमीच असते Open Manhole, असे आता नागरिकही उपहासाने म्हणू लागले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतल नालेसफाई आणि मॅनहोल बंद केल्याचे महापालिका अनेकदा सांगत असते. परंतू, दोन्ही दावे पावसात वाहून जातात. मुंबईत पाणी साचते. अनेक मुंबईकर मॅनहोलमध्ये अडकतात. पडतात आणि जीवालाही मुकतात. त्यानंतर प्रसारमाध्यमं या घटनांची दखल घेते. बातम्या बनतात. राजकीय नेते प्रतिक्रिया देतात. प्रशासन काहीसे हालचाल करते. नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे. मग परत पुढच्या वर्षा पावसाळा येतो. मॅनहोल चर्चेत येते. (हेही वाचा, Mumbai Rains Update: मुंबईत आजही पावसाची संततधार सुरु, पुढील 3,4 दिवस मुंबईकरांना काळजी घेण्याचे हवामान विभागाकडून आवाहन)

ट्विट

ट्विट

मॅनहोल किती धोकादायक?

रत्यांच्या कडेला, कधी रस्त्यांच्या मध्यात असे कुठेही मॅनहोल असतात. पावसाळ्यामध्ये सखल भागात पाणी साचते. मुंबईकर अशा पाण्यांतूनच मार्ग काढत पुढे जातात. पाण्यातून जाताना मॅनहोलचा अंदाज येत नाही. कधीकधी मॅनहोल या ठिकाणी आहे हेच कळत नाही. अशा वेळी नागरिक पाण्यातून मार्ग काढताना मॅनहोलमध्ये पडतात. कधी कधी दुचाकी आणि चारचाकी वाहनेही मॅनहोलमध्ये अडकतात. हा खेळ जीवघेणा ठरतो. अपघात होतात. अनेकांचे प्राण जातात. त्यामुळे मॅनहोल नेहमीच चर्चेचा विषय ठरता.