प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईकरांसाठी हा रविवारचा रेल्वे मेगाब्लॉक (Railway Mega Block) हा नेहमीचा विषय असला तरीही सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणा-या लोकांसाठी हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. उद्या (16 फेब्रुवारी) ला मध्य (Central), हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारण हा मेगाब्लॉक 11 ते 4 या वेळेत ठेवण्यात आला आहे. या दरम्यान मध्य रेल्वेवरील धिम्या गतीची वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. तर हार्बर मार्गगावरील ट्रान्स हार्बर (Trans Harbour) आणि हार्बर (Harbour) मार्गावरील पनवेल ला जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर पश्चिम मार्गावर माहीम ते सांताक्रूझ दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.

हा मेगाब्लॉक काही काळापुरता असला तरीही प्रवाशांची थोडी गैरसोय होणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

पाहूया कसा असेल तिन्ही मार्गांवरील मेगाब्लॉक:

1. मध्य रेल्वे

मुंबई-माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान सर्व रेल्वे जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. या रेल्वे मुलूंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर थांबतील. तसेच कल्याण वरुन सुटणा-या रेल्वे दिवा, मुलूंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबतील. तसेच या रेल्वे 15 मिनिटे उशिराने धावतील. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकांदरम्यान सुटणा-या रेल्वे 20 मिनिटे उशिराने धावतील. खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार

2. पश्चिम रेल्वे

माहीम ते सांताक्रूज दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरु राहील

3. हार्बर रेल्वे

पनवेल ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल ही सेवा सकाळी 10.3 ते 4 पर्यंत बंद राहील. तसेच ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल आणि पनवेल ते ठाणे ही सेवा सकाळी 10.12 ते 3.53 पर्यंत बंद राहील. तसेच पनवेल ते अंधेरी ही सेवा देखील या दरम्यान बंद राहील.

त्यामुळे प्रवाशांनी वरील वेळापत्रक पाहून त्यानुसार आपला प्रवास करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.