Pragati Express With Vistadome Coach: मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस 25 जुलैपासून विस्टाडोम कोच सह; आजपासून बुकिंग सुरू
Pragati Express | Twitter/ @TRupnavar

मुंबई पुणे (Mumbai-Pune)  प्रवास करणार्‍यांसाठी एक खास गोष्ट समोर आली आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली प्रगती एक्सप्रेस (Pragati Express) आता पुन्हा धावणार आहे. आता प्रगती एक्सप्रेसला देखील विस्टाडोम कोच (Vistadome Coach) असणार आहे. 25 जुलैपासून या नव्या अंदाजातील प्रगती एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे. यापूर्वी कोकणात मडगाव एक्स्प्रेस आणि मुंबई-पुणे-मुंबई धावणार्‍या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना विस्टाडोम कोच आहे.

मुंबईत सीएसएमटी स्थानकामधून प्रगती एक्सप्रेस (12125) दुपारी 4.25 ला सुटेल. पुण्याला 7.50 ला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासाची 12126 पुणे - मुंबई प्रगती एक्सप्रेस सकाळी 7.50 ला सुटणार असून मुंबईत 11.25 ला पोहचणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर इथे थांबणार आहे.

प्रगती एक्सप्रेसला 11 सेकंड क्लास डब्बे आहेत. त्यामध्ये 5 आरक्षित, 4 अनारक्षित, 1 महिलांसाठी खास डब्बा असणार आहे. 1 एसी कोच आहे. आज 20 जुलै पासून त्यासाठी आरक्षण सुरू होईल. नक्की वाचा: Vistadome Coach सह धावणार्‍या नव्या Deccan Express ची फीचर्स, वेळापत्रक ते प्रवासादरम्यान काय काय पाहू शकाल? जाणून घ्या सर्व काही.

प्रगती एक्सप्रेस 1991 पासून प्रवाशांच्या सेवेमध्ये आहे. कामानिमित्त नियमित मुंबई-पुणे प्रवास करणार्‍यांंसाठी ही गाडी खास आहे. अता या गाडीचं रूपडं पालटणार आहे. विस्टाडोम कोच हे आता या ट्रेनचंदेखील आकर्षण ठरणार आहे. संपूर्ण पारदर्शक डब्बा, अत्याधुनिक सोयी-सुविधा, प्रशस्त उत्तम आसनव्यवस्था ही या डब्ब्यांची आकर्षणं ठरणार  आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या रांगांमधून प्रवास करताना निसर्गाचं रूप न्याहाळण्याची अजून एक संधी प्रवाशांना मिळणार आहे.