Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन (Mumbai Pune Expressway) प्रवास करण्याचा विचार करच असाल तर काळजी घ्या. पुढे जाऊन वाहतूक कोंडीत (Mumbai Pune Expressway Traffic) अडकण्यापेक्षा वाहतूकीबाबत आगोदरच जाणून घ्या. सध्यास्थितीबाबत विचाराल तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सध्या प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवतो आहे. त्यात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दिवाळीचा पहिला दिवस, उद्या आणि परवा असलेले शनिवार, रविवार असे सुट्टीचे दिवस आणि त्यालाच जोडून येणारी दिवाळी (Diwali 2022) यांमुळे गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सध्या प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते आहे. सोशल मीडियावर या वाहतूक कोंडीचा एक व्हिडिओही (Traffic Congestion Video) पाहायला मिळत आहे.

मुंबई पुणे महामार्गावर प्रामुख्याने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना बोरघाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. तसेच HOC ब्रिज ते अमृतानजन पूल या दरम्यानही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ही रांग साधारण दोन किलोमटीरपेक्षा अधिक अंतरावर असल्याचा अंदाज आहे. या वाहतुक कोंडीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Seat Belt Compulsory in Mumbai: मुंबईत 1 नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक)

ट्विट

यंदा दिवाळीच्या काळात सुट्ट्या जोडून आल्या आहेत. आज म्हणजेच शुक्रवार (21 ऑक्टोबर) पासून दिवाळी खऱ्या अर्थाने सुरु होत आहे. आज सायंकाळी वसुबारसेपासून दिवाळी सुरु होईल. दरम्यान, उद्या म्हणजेच शनिवार (22 ऑक्टोबर) आणि रविवार (23 ऑक्टोबर) हे साप्ताहिक सुट्टीचे दिवस आहेत. त्यातच सोमवार ते बुधवार म्हणजेच 24 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर असे सलग तिन दिवस दिवळीची सुट्टी आहे. म्हणजेच थेट 23 ऑक्टोबर अशी सलग पाच दिवसांची सुट्टी जोडून आली आहे. सहाजिक लोकांचा गावाकडे जाण्याचा आणि प्रवास करण्याकडे अधिक कल आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत.