मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai Pune Expressway) आज (18/1/2018, शुक्रवार) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग दुपारी 12-2 या वेळात बंद राहणार येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी एक्स्प्रेस वे दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे यादरम्यान वाहतुक शेडुंग फाटा येथून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात येणार आहे.
एक्स्प्रेस वे बंद असताना काही पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रवासासाठी या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कोणते आहेत पर्यायी मार्ग?
प्रवाशांना शेडुंग फाटा, अजिवली चौक, दांड फाटा, चौक (कर्जत) फाटा, खालापूर फाटा (सावरोली फाटा) येथून खासापूरमार्गे परत खालापूर टोल नाका येथून पुण्याकडे जाता येईल. मात्र अवजड मालवाहू वाहनांना एक्स्प्रेस वेवरील चिखले पूलाजवळ थांबवण्यात येईल.
एक्स्प्रेसवेवर ओव्हरहेड गँट्रीज बनवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. यात प्रवाशांच्या सोयीसाठी एक्स्प्रेसवेवर साईनबोर्ड आणि व्हिडिओ मेसेजेस लावले जाणार आहेत. त्यामुळे यापूर्वी 10 जानेवारीला देखील एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. आज खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर गॅन्ट्रीज टाकण्यात येणार आहेत.