मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune Expressway) आज (गुरुवारी) दोन तास बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या मार्गावर ओव्हरहेड गँट्रीज बसवण्याचे काम सुरु असल्याने दुपारी 12-2 या वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतुक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वळविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने एक्स्प्रेसवेवर ओव्हरहेड गँट्रीज बनवण्याचं काम सुरु केलं आहे. यात प्रवाशांच्या सोयीसाठी एक्स्प्रेसवेवर साईनबोर्ड आणि व्हिडिओ मेसेजेस लावले जाणार आहेत.
मुंबई पुणे एक्स्प्रेसवे दोन तास बंद राहिल्याने दुपारनंतर वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता असून प्रवाशांना वाहतुकी कोंडीलाही सामोरे जावे लागले.