मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Express Way) वर कंटेनर ट्रेलर कार वर धडकल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे सध्या खोपोली (Khopoli) नजिक भोर घाट (Bhor Ghat) परिसरामध्ये ट्राफिक मंद गतीने पुढे सरकत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार, सोलापूर येथील मारूती स्विफ्ट कार मधून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून मुंबईच्या दिशेने जात होते. ट्रेलरचा ब्रेक फेल जहल्याने तो कार, टेम्पो आणि दोन कंटेनर्सला धडकला. ही वहानं एकापाठोपाठ होती. यामध्ये 7 जण जखमी झाली आहेत. चार मृतांमध्ये सोलापूरमधील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव खरात यांच्याही समावेश आहे. चळवळीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला सोलापूरात मोठा धक्का बसला आहे.
जखमींना कामोठे येथील एमजीएम रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती खोपोली पोलिस स्टेशनचे सिनियर इन्सपेक्टर शिरीष पवार यांनी TOI शी बोलताना सांगितलं आहे.
पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या मृतांपैकी तिघांची ओळख पटली आहे. त्यात गौरव खरात (36), सौरभ तुळसे (32) आणि सिद्धार्थ राजगुरू (31) यांचा समावेश आहे. चौथा मृत पुरूष याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. भोर घाटात एका ट्रकचा टायर पंक्चर असल्याने तो जागीच उभा होता. यामुळे ट्राफिक रेंगाळत आहे. मुंबई कडे जाणार्या मार्गिकेवर 5 किमीची रांग आहे. तर उलट दिशेने जाणार्या मार्गिकेवर कार आणि ट्रेलरचा अपघात झाला आहे. मागून येणार्या ट्रेलर कार वर आदळला आणि त्यापुढे उभ्या असलेल्या ट्रक आणि टेम्पो मध्ये चिरडली. जागीच कारमधील चार जण मृत्यूमुखी पडले आहेत. नक्की वाचा: Maharashtra Road Accident: 2021 मध्ये महाराष्ट्रात 29,000 हून अधिक रस्ते अपघातांची नोंद; 13,346 लोकांचा मृत्यू .
Maharashtra | Four people killed after a speeding truck lost control & collided with several vehicles stuck in slow traffic along the Mumbai-Pune Expressway in Khopoli, Raigad, at 6:30am today; 7 people were injured, of which 4 people were shifted to a hospital: Expressway Police pic.twitter.com/2U7sgFMrP6
— ANI (@ANI) February 15, 2022
सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्यानंतर महामार्ग पोलिस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा या घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी विविध वाहनांमध्ये जखमी असलेल्यांना मदत केली. तातडीने ही आपघातग्रस्त वाहनं दूर करण्यात आली आहे.