मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याने वाहतूकीच्या मार्गात बदल
Representational Image (Photo Credits: File Photo)

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. मात्र प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी सध्या वाहतूक जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली आहे.

लोणावळा-खंडाळा परिसरात कालपासूनच होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. सध्या दरड हटवण्याचं काम सुरु आहे. दरड कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाळ्यात प्रवास करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 9 जुलै रोजी दोन तास बंद राहणार)

आज सकाळी पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.